सोलापुरात मालगाडी रुळावरून घसरली, इंजिन रुळ सोडून पोहोचले शेतात Published on : 4 September 2022, 1:30 pm

in #all2 years ago

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. करमाळा तालुक्यात सोलापूरहून पुण्याकडे जाणारी मालगाडी रुळावरून घसरली. रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. ३.४० च्या सुमारास हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Train Accident in Solapur news in Marathi)
हेही वाचा: Cyrus Mistry : सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अजूनही विश्वास बसत नाही, सायरस माझ्यासाठी..."

मिळालेल्या माहितीनुसार, केम ट्रॅकजवळ सिमेंट वाहतूक करणाऱ्या मालगाडीचे दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरले. घटनेनंतर रेल्वेचे इंजिन शेतात घुसले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मुंबईहून कर्नाटककडे जाणाऱ्या गाड्या अडकून पडल्या असून उशिराने धावत आहेत.घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले. सध्या ट्रॅकच्या दुरुस्तीबरोबरच इंजिन आणि कोच रुळावर ठेवण्याचे काम सुरू आहे. मात्र, रेल्वेचे इंजिन रुळावरून घसरल्याने काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

रुळावरून घसरलेली मालगाडी लूप ट्रॅकवर होती. त्यामुळे अपघातानंतर काही वेळातच इतर गाड्यांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. मालगाडी रुळावरून घसरण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासानंतरच अपघाताचे कारण समोर येईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
Web Title: Train Accident In Solapur Engine Entered In Field
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.
टॅग्स :Solapuraccident newscentral railway
HomeMaharashtraTrain Accident In Solapur Engine Entered In Field Rad88

Subscribe to Notifications