Mumbai Local : हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत, प्रवासी ट्रॅकवरून जाताहेत चालत

in #all2 years ago

mauaua.jpgMumbai News : मुंबईतील हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठं वृत्त समोर येत आहे. हार्बर मार्गावरील रेल्वे (Railway) वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळं स्थानकावर प्रवाशांची गर्दी झालेली दिसत आहे.दरम्यान, तांत्रिक बिघाडीमुळं वाशीवरून 9.44 ला निघालेली लोकल 27 मिनिटं सीएसटीला उभी होती. त्यामुळं कंटाळून लोक ट्रॅकवरून चालताना दिसत होते. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं ही लोकल सीएसटी स्थानकावर उभी होती, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय. तांत्रिक बिघाडीमुळं ४० ते ५० मिनिटं उशीरा थांबलेली लोकल आता पुन्हा सुरु झाली आहे.

Sort:  

Plz like me my all post