मलेरियावर जीन हे टॉनिक; तर फ्लूसाठी व्हिस्की हे औषध?

in #alcohol2 years ago

अनेक आजारांवर उपचार म्हणून अल्कोहोलचा वापर केला जात होता. पोटदुखी, बद्धकोष्ठता, इतकंच नाही, तर फ्लू आणि मलेरिया यांसारख्या महामारीत मद्य हे महत्त्वपूर्ण औषध ठरलं; पण हे औषध नाही तर दारू आहे, असं लक्षात येऊ लागलं आणि मग संपूर्ण जग दारूच्या व्यसनात अडकत गेलं. मद्याचा वापर औषधोपचार म्हणून नेमका केव्हा केला गेला हे जाणून घेणं आवश्यक आहे. डब्लूएचओच्या अहवालानुसार, दर वर्षी जगभरात मद्यपानामुळे 30 लाखांहून अधिक मृत्यू होतात.

मद्यामुळे होणारे आजार आणि रस्ते अपघातांचा यात समावेश आहे. पूर्वीच्या काळी मद्याचा वापर औषधोपचार म्हणून केला जाई. कालपरत्वे ही दारू असल्याचं लक्षात आलं; पण तोपर्यंत जगभरातले अनेक जण दारूच्या व्यसनाधीन झाले होते. औषध म्हणून अल्कोहोल वापरण्याची सर्वांत जुनी उदाहरणं प्राचीन इजिप्त आणि चीनमध्ये आढळतात.

टेलिग्राफच्या एका वृत्तानुसार, प्राचीन इजिप्शियन लोक अल्कोहोलमध्ये औषधी गुणधर्म यावेत, यासाठी विविध प्रकारच्या औषधी वनस्पती मिसळत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ख्रिस्तपूर्व 3100 वर्षांपूर्वी हे घडत होतं. ख्रिस्तपूर्व 460 ते 370 या काळात प्रसिद्ध ग्रीक युनानी अभ्यासक हिप्पोक्रेटिस यांनी लिहिलं आहे, की वाइन हा मानवजातीसाठी, निरोगी शरीरासाठी आणि आजारी माणसासाठी योग्य उतारा आहे. जगभरातले अ‍ॅलोपॅथी डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात उतरण्यापूर्वी ज्यांच्या नावे शपथ घेतात, ती हिप्पोक्रेटिक ओथ म्हणून प्रसिद्ध आहे.n4441145861669074122687677af107303dadb1642a0b69581b72033b405cb345197d97cf9c09772748e22f.jpg