Asha Parekh : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
Asha Parekh Dada Saheb Phalke Award : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2022 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. यापूर्वी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.