ईडीला पुन्हा मोठा झटका! ऋषिकेश देशमुख यांनाही सत्र न्यायालयाकडून जामीन
याआधी अनिल देशमुख व त्यांचे थोरले चिरंजीव सलील देशमुख यांनाही ईडीच्या गुह्यात जामीन मंजूर झालेला आहे. त्यामुळे या निर्णयाने देशमुख कुटुंबीयांना दिलासा, तर ईडीला पुन्हा मोठा झटका बसला आहे.
कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात यापूर्वी अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. त्यानंतर सलील देशमुख यांनाही सत्र न्यायालयात जामीन मंजूर झाला. ऋषिकेश देशमुख यांनी मागील सुनावणीवेळी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला होता. सोमवारी त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे प्रत्यक्ष हजेरी लावली. त्यांच्या वतीने अॅड. विक्रम चौधरी यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम 88 अन्वये जामिनासाठी अर्ज केला. ऋषिकेश देशमुख यांनी तपासामध्ये संपूर्ण सहकार्य केले आहे.
Good line