भारताची आजपासून बांगलादेश मोहीम

in #yavatmal2 years ago

ढाका : रविवार ( ता. ४) पासून भारताचा बांगलादेशचा एकदिवसीय दौरा सुरू होत आहे. गेल्या दोन वर्षांत दोन ट्वेंटी-२० विश्वकरंडक खेळविण्यात आल्याने भारतीय संघ जास्त एकदिवसीय सामने खेळलेला नाही. मात्र पुढील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात भारतातच एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा खेळविण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्यापासून (ता. ४) भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळविण्यात येणारी एकदिवसीय मालिका ही महत्त्वाची असणार आहे. या बांगलादेशच्या दौऱ्यात भारतीय संघात आघाडीचे तिन्ही फलंदाज भाग घेणार आहेत.