एसटी चालकाने मुलीचा मृत्यूदेह नेला एसटी आगारात;

in #yavatmal2 years ago

Screenshot_2022-05-26-18-30-47-29_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg
यवतमाळ : एसटी चालक किशोर राठोड यांची चौदा वर्षाची अंपग मुलगी नेहमी आजारी राहत असल्याने तिला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याकरिता एसटी चालकाने दिग्रसचे आगार प्रमुख संदीप मडावींना रजा देण्याची विनंती केली.मात्र आगार व्यवस्थापकाने रजा न दिल्यामुळे मुलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला असा आरोप करित चालकाने चक्क मुलीचा मृत्यूदेह ऑटोने एसटी आगारात आणल्याने मोठी खळबळ उडाली.दरम्यान दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी एसटी आगारात धाव घेत प्रकरण तडजोड करण्याचा प्रयत्न केला मात्र एसटी चालक आक्रमक होत आगार व्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई जो पर्यंत करणार नाहीत,तो पर्यंत आगारातून हलणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलीसांपुढे ही मोठा पेच निर्माण झाला. उशीरा पर्यंत कोणावरही या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.विशेष म्हणजे आगार व्यवस्थापक आणि अन्य दोघे नेहमी चालक राठोड यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.

Sort:  

Please like karne ke baad follow bhi kare 🙏🙏 me bhi aapko follow kar raha hun.