नितीन गडकरींचं भाषण ऐकून मलाही कारखाना सुरू करावासा वाटतोय - उद्धव ठाकरे

in #yavatmal2 years ago

bhushan_esakal__98_.jpgपुण्यातल्या वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट इथं आज साखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण करत नितीन गडकरींसह शरद पवारांचं कौतुक केलंय. त्याचबरोबर साखर उद्योगातल्या तज्ज्ञांना एकत्र येऊन काम करण्याचं आवाहनही केलं आहे. (Uddhav Thackeray in Pune Sugar Conference 2022)या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, " आम्ही शहरी बाबू आहोत, साखरेबद्दल काय बोलणार? आम्हाला फक्त चहा मध्ये साखर किती एवढंच माहिती होतं. आता गाडीत साखर किती लागते हे म्हणायला हरकत नाही. प्रत्येकवेळी साखर कारखाने, ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांना आधार देत असतो. काही कारखाने उत्तम चालू आहेत पण सहकारी कारखाने कमी चालतात."नितीन गडकरींचं (Union Minister Nitin Gadkari) भाषण ऐकून मला कारखाना चालू करावासा वाटतो आहे पण मी ते धाडस करणार नाही. असंही उद्धव ठाकरे आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले. ते पुढे म्हणाले, "ब्राझीलने धोरण जे आखलं ते आपण आखलं पाहिजे. आपला शेतकरी नेहमी मेहनत करतो. तो कमावलेल्या मातीचे सोने होत नाही. काही दिवसांनी इथेनॉल वापरलं नाही तर लोक वेड्यात काढतील. केंद्राने आयकर वसुली कारखाने यांच्यावर मुक्त केली अशीच काही धोरणं आपण पंतप्रधानांशी बोलूयासाखरेमधला गोडवा पवार यांनी कार्यक्रमात आणला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे. या साखर परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.