उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “ते शिवसैनिक नाही, तर दगाबाज…”

in #pune2 years ago

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर शिंदे गटावर टीका केली आहे. हे शिवसैनिक नाही, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. उद्धव ठाकरेंनी आज शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यांना बाळासाहेबांचा फोटो हवा, पण त्यांचा मुलगा नको अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडलं.

उद्धव ठाकरे यांची आज शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. हिंमत असेल तर नवा पक्ष काढा असं आव्हान यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना दिला. एकनाथ शिंदेवर टीका करताना ते शिवसैनिक नव्हे, तर दगाबाज मुख्यमंत्री असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपाला शिवसेना संपवायची होती या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde-15.jpg