IND VS SA : आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या T-20 सामन्यात बुमराला पर्याय शोधण्याचा प्रयत्न

in #in2 years ago

India vs South Africa 2nd T20I : जसप्रीत बुमराशिवाय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा खेळावी लागणार हे आता जवळपास निश्चित आहे. यासाठी मानसिकतेबरोबर दुसरा पर्यायही तयार करण्याचा सराव भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उरलेल्या दोन सामन्यांतून करण्याची संधी आहे. यातील एक सामना उद्या होत आहे. बुमराच्या अनुपस्थितीत खेळताना भारताने आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. आजचा सामना नव्या तयारीसह मालिका जिंकण्यासाठीही महत्त्वाचा आहेगुवाहाटीत तसे फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट होत नाही, त्यामुळे तेथील क्रिकेटप्रेमींसाठी उद्याचा सामना पर्वणीच घेऊन आला आहे. सर्व तिकिटे संपलेली आहेत. दुर्गा पूजेचा उत्सव, त्यात क्रिकेटचा सामना; यामुळे गुवाहाटीमधील वातावरण बदलले असून सर्वत्र वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय खेळाडूंच्या बसलाही या कोंडीचा फटका बसला.विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी बुमराला केंद्रस्थानी ठेवून भारतीय संघ व्यवस्थापनाने तयारी सुरू केली होती, परंतु आता डावपेच बदलावे लागणार आहेत, पण त्यासाठी दोनच सामने शिल्लक आहेत.

Sort:  

hi