विजयी सुरुवात; स्टुअर्ट बिन्नीने ठोकले अर्धशतक

in #yavatmal2 years ago

ताज्या
शहर

|| गणेशोत्सव ||
गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा
ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

India Legends ची विजयी सुरुवात; स्टुअर्ट बिन्नीने ठोकले अर्धशतक
Published on : 11 September 2022, 2:42 am

By
किरण महानवर

India Legends vs South Africa Legends : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 मध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यात सामना खेळला गेला. इंडिया लिजेंड्सने या सामन्यात दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा 61 धावांनी पराभव केला. इंडिया लिजेंड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे.

हेही वाचा: Virat Kohli : 'खाओ पियो ऐश करो...' विराट कोहलीचा लहानपणीचा फोटो व्हायरल

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंडिया लिजेंड्सने सुरुवात चांगली झाली. सचिन तेंडुलकर आणि नमन ओझा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. यानंतर सचिन तेंडुलकर 15 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. पुढच्याच षटकात नमनही 21 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. सुरेश रैनाने 22 चेंडूत 33 धावांची दमदार खेळी केली. युवराजने 8 चेंडूत 6 धावा केल्या. युसूफ पठाणने 12 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले. भारताने शेवटच्या पाच षटकात 80 पेक्षा जास्त धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीने 42 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 82 धावांचे तुफानी अर्धशतक झळकावले. इंडिया लिजेंड्सने 20 षटकांत दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला 217 धावांचे मोठे लक्ष्य दिले.bhushan_esakal___2022_09_11T081110_217.jpg