तुमचा उत्साह भक्ती आणि शक्तीची अनुभूती देणारा'; प्रीतम मुंडेंच्या रॅलीचे जोरदार स्वागत

in #yavatmal2 years ago

परळी (बीड) : परंपरेप्रमाणे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथ गड येथून भगवान भक्तीगडाकडे आज सकाळी रॅली निघाली. रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. समर्थकांनी मोठे हार देऊन त्यांचे स्वागत केले. तर काही ठिकाणी रॅली मार्ग आणि खा. मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.

गोपीनाथगड येथे सकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दर्शनानंतर खा.प्रितमताई मुंडे यांची रॅली सावरगाव घाटकडे मार्गस्थ झाली. भगवान भक्तीगडाकडे मार्गस्थ झाल्यानंतर ठिकठिकाणी स्थानिक लोकांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गोपीनाथगड, सिरसाळा, दिंदृड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी मार्गे नायगाव, तांबवा राजुरी, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंब या मार्गे रॅली भगवान भक्तीगड सावरगाव घाट येथे दुपारी बारा बाजे दरम्यान पोहोचली. काही वेळानंतर माजीमंत्री पकंजा मुंडे यांचे देखील भगवान भक्ती गडावर आगमन झाले.

दरम्यान, रॅलीला मिळाल्या उत्स्फूर्त प्रतिसादावर खा. मुंडे यांनी प्रतिक्रिया देत सर्वांचे आभार मानले आहेत. तुमचा उत्साह भक्ती आणि शक्तीची अनुभूती देणारा आहे...धन्यवाद. अशा भावना खा. मुंडे यांनी व्यक्त केली.

pritam-munde-abad-1_202210892244.jpg