टीपच्या आधारावर टाकला होता दरोडा, इतक्या लाखांची रोकड जप्त, आरोपीही जेरबंद

in #yavatmal2 years ago


रात्री एका व्यापाऱ्याचा कर्मचारी लॉकरमध्ये पैसे ठेवण्यासाठी जात होता.
सुनील ढगे, Tv9 मराठी प्रतिनिधी, नागपूर : लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन दिवसांपूर्वी दरोडा पडला. यात एका व्यक्तीकडून वीस लाख रुपये लुटण्यात आले. पोलिसांनी तपास केला. दरोडा टाकणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणात आठ आरोपींना ताब्यात घेतलं. 14 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. नागपुरातील या मोठा दरोड्याचा खुलासा आज पोलिसांनी केला.