पाकिस्तानने समुद्रामार्गे भारतात पाठवले 350 कोटींचे ड्रग्ज, अशी झाली कारवाई

in #yavatmal2 years ago


पाकिस्तानातून समुद्रामार्गे येणार ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई करण्यासाठी तटरक्षक दलाने...
गांधीनगर, पाकिस्तानची (Pakistan) कुरघोडी पुन्हा एकदा समोर आली आहे. समुद्रामार्गे तस्करी (Drugs Smuggling) करून पाठवत असलेले तब्बल 350 कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. भारतीय तटरक्षक दलाने गुजरात (Gujrat) किनारपट्टीपासून 50 किमी अंतरावरील आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ ‘अल सकार’ (Al Sakar) या पाकिस्तानी बोटीला पकडून सुमारे 350 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात केले. या बोटीत 6 पाकिस्तानी लोकं होते. त्यांच्याकडून 50 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गुजरात पोलिसांचे डीजीपी आशिष भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये राहणारा एक मोठा ड्रग पॅडलर मोहम्मद कादर याने येथे हेरॉइनची खेप पाठवली होती, अशी माहिती मिळाली होती.