‘ हे ‘ पदार्थ खा आणि हाय ब्लड शुगरची समस्या ठेवा दूर

in #nagpur2 years ago


काही लोकांना असं वाटतं की नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी सावधगिरी बाळगल्यानेच साखर नियंत्रित केली जाऊ शकते.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे (high blood sugar) याला हायपरग्लेसेमिआ असेही म्हटले जाते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही जेवताना ब्लड शुगर वाढवणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. तुम्हाला जर कॉफीची (coffee) आवड असेल किंवा नाश्ता न करण्याची (skipping breakfast) सवय असेल तर तुमच्या या सवयी रक्तातील साखर वाढवण्यासाठीही काम करू शकतात, असे ईट धिस नॉट दॅट मध्ये नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही कोणते पदार्थ खाता आणि कोणत्या प्रकारच्या वातावरणात राहता, यामुळे देखील रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो.