शरद पवारांना हे....'; ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

in #yavatmal2 years ago

उद्धव ठाकरे आज राजीनामा देणारं आहेत याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती नव्हतं. अशी माहिती राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी (Jayant Patil said that Sharad Pawar was surprised by Uddhav Thackeray's resignation maharashtra politics) माध्यमांशी बोलताना दिली.राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा (Cm Uddhav Thackeray Resign) राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतलामुख्यमंत्र्यांच्या या राजीनाम्यानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया काय होती असे विचारले असता, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन घोषणा केली त्यावेळीं आपल्याला आणि शरद पवार यांना माहिती मिळाली. शरद पवार यांना याच आश्चर्य वाटलं, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.सर्वोच्च न्यायलयाने गुरुवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणार होती. मात्र या बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.