Adipurush: 'हा रावण की खिलजी?'; सिनेमातील सैफच्या लूकवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

in #digras2 years ago

क्रिती सनन यांच्या 'आदिपुरुष' या सिनेमाच्या टिझरची लोक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. पण टीझर रिलीजनंतर लोक याची खिल्ली उडवताना दिसत आहेत,याचा कदाचित मेकर्सने देखील विचार केला नसेल. रामायणाची कथा सिल्व्हर स्क्रीनवर आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओम राऊतनं सिनेमाच्या रुपात विषय पडद्यावर तर आणला खरा,पण प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण होतील का? आता हे रिलीजनंतरच कळेल. पण सध्या तरी टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची निराशा झालेली आहे.Untitled_design___2022_10_03T171709_882.jpg

२ ऑक्टोबरला अयोध्येत 'आदिपुरुष'च्या ग्रॅन्ड टीझर रिलीजचा सोहळा पार पडला. चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. पण टीझर रिलीजनंतर काही मिनिटातच ट्रोलिंगचा सिलसिला सुरु झाला. आदिपुरुषच्या टीझरला चक्क एनिमेटेडेट सिनेमा म्हणून फटकारलं गेलं. सिनेमातील VFX च्या दर्जावरनं प्रश्न उठवले जाऊ लागले. सिनेमात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. पण त्याच्या लूकपासून ते पुष्पक विमानापर्यंत सगळ्यावरच जोरदार ट्रोलिंगचा मारा होवू लागला. सैफला पाहून टोलर्सचं म्हणणं पडलं की रावण नाही हा तर अल्लादिन खिलजीच जास्त वाटू लागलाय.

हेही वाचा: Adipurush: शूटिंगच्या तिसऱ्याच दिवशी प्रभासनं भीतीनं दिग्दर्शकाला केलेला फोन, म्हणालेला...

रावण बनलेल्या सैफच्या लूकनं नेटकऱ्यांना नाराज केलंय. छोटे छोटे स्पाइक हेयर्स,लांबलचक दाढी, डोळ्यात काजळ ..असा सैफचा लूक पाहून एका नेटकऱ्यानं लिहिलंय,'काय हे? रावणचा रिजवान कधी झाला?' एका नेटकऱ्यानं तर म्हटलंय की,'सैफनेच मुघलांसारखा लूक ठेवण्याची आयडिया दिली असेल'. सैफचा हा लूक पाहिल्यानंतर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, 'काय मूर्खपणा आहे हा ? हे खूपच खेदजनक आहे''.

हेही वाचा: Big Boss 16: 'हिला पैसे मिळाले की आली...', साजिद खानचं समर्थन कश्मिराला भोवलं, नेटकरी भडकले...

नेटकरी सैफच्या पुष्पक विमानाला पाहून हैराण झाले आहेत. कारण आता पर्यंत रामायणाचं कथानक ज्या-ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून समोर आलं त्या-त्या वेळेस पुष्पक विमानाचा थाट काही औरच पहायला मिळाला. पण ओम राऊतच्या 'आदिपुरुष'मधील पुष्पक विमानानं मात्र लोकांची पूर्णपणे निराशा केली. टीझरमध्ये सैफ एका भयानक प्राण्यावर बसलेला दिसत आहे. लोकांनी या प्राण्याचं एक विचित्र नाव देखील ठेवलं आहे. ओम राऊतने हा सिनेमा बनवायला ५०० करोड का वाया घालवले असं म्हणत नेटकरी आपला राग व्यक्त करत आहेत.