रोहित विक्रमासाठी तयार, आयपीएलनंतर ब्रेक नाही..दक्षिण आफ्रिकाविरोधात उतरणार मैदानात

in #mumbai2 years ago

South Africa Tour of India : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला यंदा आयपीएलमध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. रोहितच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिका संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात काही सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात येणार आहे. पण रोहित शर्मा या दौऱ्यासाठी उपलब्ध असेल. या दौऱ्यात रोहित शर्मा विश्वविक्रमाला गवसणी घालू शकतो..

दक्षिण आफ्रिकाविरोधात भारताने पहिला सामना जिंकल्यास रोहित शर्मा खास रेकॉर्ड आपल्या नावावर करु शकतो. जुलैमध्ये होणाऱ्या वेस्टविंडिज आणि इंग्लंड दौऱ्याआधी भारत दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशात टी 20 मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधात पहिला सामना जिंकल्यास रोहित शर्मा मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. लागोपाठ 13 टी सामने जिंकण्याचा विक्रम रोहितच्या नावावर होऊ शकतो. लागोपाठ टी 20 सामने जिंकण्याचा विक्रम अफगानिस्थान आणि रोमानिया या देशांच्या नावावर आहे. या देशांनी प्रत्येकी 12 लागोपाठ सामने जिंकले