'ब्राह्मणाने 2017 मध्ये मराठ्यांची झोळी भरली'; तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान

in #nagpur2 years ago

Canva.jpgमुंबई : शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सरकारच्या काळात आरक्षण मिळेलच पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले. त्याचबरोबर राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेतली असा आरोप त्यांनी केला आहे.(Tanaji Sawant On Maratha Reservation)