Viral Video: आगाऊपणा नडला! दोघांनी तोऱ्यात रॉकेट सोडलं पण उलटंच घुसलं
दिवाळीचा उत्सव आता संपला आहे. दिवाळीत अनेकांनी फटाके फोडण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. यामुळे काही जणांचे जीव गेले आहेत तर अनेक जणांना दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर रॉकेट सोडणाऱ्या युवकांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. रॉकेट त्यांच्याच अंगावर गेल्याने युवकाचे कपडे जळाल्याचं या व्हिडिओत दिसतंय.
दरम्यान, हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अजून समोर आली नसून एका गल्लीतील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत दोन मुले दिवाळीच्या फटाक्यात असलेले रॉकेट पेटवताना दिसत आहेत. तर पेटल्यानंतर दुसरा मुलगा दूर फेकून देतो. त्यानंतर रॉकेट वेग धारण करून दुसऱ्या युवकाच्या अंगावर जाते. अंगावर आल्यानंतर त्याच्या कपड्यांनी पेट घेतल्याचं आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे