आपचे मंत्री सत्येंद्र जैन अडचणीत, ईडीच्या धाडीत सोन्याची बिस्कीटं आणि करोडो रुपये जप्त
ED Raid : आप नेते आणि दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने सत्येंद्र जैन (ED raid on Satyendra Jain places ) यांच्या काही ठिकाणांवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.