ताजमहालला शिव मंदिर, कुतुबमिनारला विष्णुस्तंभ म्हणणारे पी.एन. ओक कोण होते?

in #tiwari2 years ago

मुंबई: ताजमहाल आणि कुतुबमिनार संदर्भातीला वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. ताजमहाल हा तेजोमहालय असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर, कुतुबमिनार हा विष्णू स्तंभ असल्याचा दावा करण्यात आला आहे. काल, कुतुबमिनार जवळ काही जणांनी हनुमान चालिसा देखील म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. ताजमहालामधील बंद असलेल्या खोल्यांचे दरवाजे उघडून त्याचं पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी केली जात आहे. १९५६ मध्ये इतिहास अभ्यासक पी एन ओक यांनी ताजमहाल हे शिवमंदीर असल्याचा त्यांच्या पुस्तकात दावा केला होता. २०१५ मध्ये आग्रा सत्र न्यायालयात ताजमहालाला तेजोमहालय मंदिर जाहीर करण्यासाठी याचिका दाखल झाली होती. २०१७ मध्ये भाजप खासदार विनय कटियार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालाला तेजोमहल मंदिर घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र, ताजमहाल हे शिव मंदिर आहे असा दावा पी.एन. ओक यांनी केला होता.maharashtra-times.jpg