महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

in #digras2 years ago

आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीचे दर स्वस्त झाले असून सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी्च्या दरात चढ उतार दिसून येत आहे. मात्र सध्या लग्नसराई संपत आल्याने सोन्याचे भावातही घसरण दिसत आहे.आज सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. या घसरणीनंतर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,740 रुपये तर 24 कॅरेट साठी ₹52,090 रुपये आहे तर चांदीच्या दरातही थोडी घसरण झाली असून १० ग्रॅम चांदीचा दर आज ६१२ रूपये आहे. (gold silver rate todays update 1 june 2022)