अकोला : कोविड बळींच्या पाल्यांना दहा लाखांची मुदतठेव

in #aakola2 years ago

अकोला : पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेचा शुभारंभ नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोविड संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना, त्यांच्या पालनकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्ह्यातील पाच अनाथ बालकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या मुदतठेवीचे पासबुक, प्रधानमंत्री मोदी यांचे स्नेहपत्र, हेल्थकार्डचे वितरण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित या सोहळ्याला जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल न्याय मंडळचे ॲड. वैशाली गावंडे, ॲड. सारिका घिरणीकर, बाल कल्याण समितीचे सदस्य अविनाश मुधोळकर, जिल्हा संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर, चाईल्ड लाईनच्या समन्वयक हर्षाली गजभिये, संरक्षण अधिकारी सुनील सरकटे, सुनील लाडूलकर, सामाजिक कार्यकता सतीश राठोड, रेवत खाडे, संगीता अभ्यंकर आदी उपस्थित होते.