PFI चे देशविरोधी कृत्य; १२ जिल्ह्यांतील ८० जणांना अटक

in #vedant2 years ago

pfi_protest_karnataka_pti.jpgबंगळूर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरुद्धची कारवाई सुरू ठेवत, कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी (ता. २७) पहाटे दोन टप्प्यात छापे टाकले आणि राज्यभरात सुमारे ८० जणांना अटक केली. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. बागलकोट, कोलार, बेळगाव, चित्रदुर्ग, कोप्पळ, चामराजनगर, रायचूर, विजापूर, गुलबर्गा, बिदर, रामनगर, यादगिरी जिल्ह्यांत अधिकाऱ्यांनी ८० जणांना अटक केली.