BB 16 : १,००० कोटींवर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, इतके पैसे मिळाले तर...

in #vedant2 years ago

Salman_Khan_Bigg_Boss_11_2.jpgसलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा बिग बॉसच्या (Bigg Boss 16) नव्या सीझनमुळे चर्चेत आहे. या शोची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर मंगळवारी शोची पत्रकार परिषद झाली. जिथे सलमानने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. दरवर्षी सलमानची फी चर्चेत असते. सलमानने यंदाच्या सीझनसाठी १,००० कोटी घेतल्याच्या बातम्या आल्या. सलमानला याबाबत विचारले असता बातमी चुकीची असल्याचे सांगितले. सलमानने यावर दिलेले उत्तर मजेशीर आहे.
‘इतके पैसे मिळाले तर मी आयुष्यात कधीच काम करणार नाही. त्याचा एक चतुर्थांशही मिळाले नाही. माझा खर्चही खूप आहेत. मला वकिलांनाही पैसे द्यावे लागते. वकीलही सलमान खान आहे. सलमान खान इथून घेतो, सलमान खान तिकडे घेऊन जातो’ असा सलमान खान (Salman Khan) म्हणाला.