Amitabh Bachchan यांच्या वाढदिवसाला अभिषेकनं रडवलं; Video पाहून तुम्हीही वडिलांना घट्ट मिठी माराल
Amitabh Bachchan Birthday : 'नमश्कार देवियों और सज्जनो... मै अमिताभ बच्चन आप सभी का स्वागत करता हूँ'....हा आवाज कानांवर पडल्यानंतर नजर आपोआप एका चेहऱ्यावर खिळते. महानायक, शहनशाह, मुकद्दर का सिकंदर अशी ओळख असणारा हा चेहरा म्हणजे बिग बींचा. अमिताभ हरिवंशराय बच्चन असं नाव असणाऱ्या अमिताभ यांनी गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. हा अभिनेता अनेकांसाठी आदर्श, कोणासाठी आधार, तर कोणासाठी प्रेरणास्त्रोत. कुटुंबीयांसाठी बिग बी म्हणजे हक्काचे, जिवाभावाचे 'पा'.