उद्धव ठाकरे हे मराठाद्वेष्टा, त्यांना मराठा माणूस मोठा झालेला बघवत नाही: रामदास कदम

in #ganpati2 years ago

मुंबई:उद्धव ठाकरे हे मराठाद्वेष्टे आहेत, ते मराठा समाजाच्या व्यक्तींचा द्वेष करतात, असा गंभीर आरोप शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी केला. मी पूर्ण जबाबदारीने सांगतोय की, उद्धव ठाकरे हे मराठाद्वेष्टे आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मराठा माणूस मोठा झालेला आवडत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मराठा नेत्यांना संपवून टाकतात, साफ करुन टाकतात किंवा त्यांना वापरून घेतात. हे मी खूप जवळून पाहिले आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.ramdas-kadam-uddhav-thackeray-1-93950626.jpg