रविंद्र जडेजाला पर्याय कोण? चिंता नाही, रोहित शर्माला हुकमी एक्का सापडला!
मुंबई: आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) मध्ये भारतीय क्रिकेट संघाला अत्यंत वाईट पराभवांना सामोरे जावे लागले. भारताने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले. परंतु सुपर-४ टप्प्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. या आशिया चषकात टीम इंडियाचे प्रयोग सुरुच राहिले. संघाने सलामीला विराट कोहलीला आजमावून पाहिलं. मधल्या फळीत ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांचाही प्रयोग केला. मात्र, यामध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दुखापतीने संघाचं टेन्शन अधिक वाढवलं. त्याचा पर्यायही संघाला मिळू शकलेला नाही. आता जडेजा विश्वचषक खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.