हायकोर्टात संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा

in #yavtmal2 years ago

कथित १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा यांना गोवल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात त्यांनी १०० कोटी रुपयांचा दिवाणी स्वरूपाचा अब्रुनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे.

संजय राऊत यांनी मला १०० कोटी रुपये द्यावेत किंवा ती रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करावी, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी दाव्यात केली आहे.