गौरी गणपतीत सोनं स्थिरावलं! जाणून घ्या आजचे नवे दर
मागील आठवड्यात सुरवातीपासून सोने चांदीत अस्थिरता दिसून आली मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. रविवारी सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती. आज सोने चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवामुळे सर्वांचा सोने चांदी खरेदी करण्याकडे कल दिसत असल्याने सोने चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे. आज 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 46,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,890 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 525 रुपये आहे. (gold silver price update 2 september 2022)