2022 - 23 चे शैक्षणिक वर्ष शिक्षण जागृती वर्ष म्हणून ओळखले जाणार

in #wortheum2 years ago


बेळगाव - कोरोनाच्या संकटामुळे (Corona Crisis) गेली २ वर्षे शैक्षणिक वर्षाला (Educational Year) सुरवात होण्यास विलंब झाला होता. मात्र २०२२ - २३ च्या शैक्षणिक वर्षाला लवकर सुरवात होणार असून नवीन शैक्षणिक वर्षाला शिक्षण जागृती वर्षं (Education Awareness Year) म्हणून ओळखले जाणार आहे. तसेच मागील व नवीन शिक्षण पध्दतीची विद्यार्थ्यांना ओळख निर्माण करून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे या वर्षी लवकर शाळा सुरू करून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. तसेच या शैक्षणिक वर्षात १८ महिन्यांवरील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आवड निर्माण करण्यासाठी त्यांना पाठ्यपुस्तक उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार असून प्रत्येक विषयाच्या पेपरची पन्नास पानांची पुस्तिका शिक्षकांना दिली जाणार आहे.नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी पुस्तकांच्या छपाईचे काम वेगाने हाती घेण्यात आले असून पाठ्यपुस्तके वितरणासाठी शिक्षण खात्याने संबंधित अधिकाऱ्यांना नियोजन करण्याची सूचना केली आहे.
RECOMMENDED ARTICLES
सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हिडिओवर शशी थरूर यांचं स्पष्टिकरण, म्हणाले..
desh
सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हिडिओवर शशी थरूर यांचं स्पष्टिकरण, म्हणाले..
7 Apr 2022
READ MORE
Punjab: सत्तेत येताच तडाखा! अँटी गँगस्टर टास्क फोर्सला थेट कारवाईचे निर्देश
desh
Punjab: सत्तेत येताच तडाखा! अँटी गँगस्टर टास्क फोर्सला थेट कारवाईचे निर्देश
8 Apr 2022
READ MORE
पोलिसांनी पत्रकारांना अर्धनग्न करून केले उभे; छायाचित्र केले व्हायरल
desh
पोलिसांनी पत्रकारांना अर्धनग्न करून केले उभे; छायाचित्र केले व्हायरल
7 Apr 2022
READ MORE
मोठी बातमी : 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील
व्यक्तींना प्रिकॉशनरी डोस
desh
मोठी बातमी : 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील व्यक्तींना प्रिकॉशनरी डोस
8 Apr 2022
READ MORE
desh
महिलेने खिडकी उघडताच जागतो भाजप नगरसेवकाचा सैतान; करतो अश्लील हावभाव
7 Apr 2022
READ MORE
desh
बेंगळुरू : सहा शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, वाचा शाळांची यादी
8 Apr 2022
READ MORE
desh
नवविवाहित जोडप्याला 'जळजळीत' भेट.. लग्नात एकच हवा!
8 Apr 2022
READ MORE
desh
माहेरी गेल्यावर पत्नी राहिली गरोदर; पती म्हणाला...
8 Apr 2022
READ MORE
desh
आसारामच्या आश्रम आवारात कारमध्ये सापडला युवतीचा मृतदेह
8 Apr 2022
READ MORE
maharashtra
नाना पटोले शरद पवारांच्या भेटीला, 'त्या' बैठकीनंतर राज्यात घडामोडींना वेग
8 Apr 2022
READ MORE
नवीन पुस्तकं बाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकां बरोबरच वर्कशीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नवीन शिक्षण पद्धतीबाबत पालकांना योग्य ती माहिती देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी शिक्षण जागृती वर्षात दर महिना विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा सूचनाही शिक्षण खात्यातर्फे करण्यात आल्या आहेत.नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाटे पुस्तकांसह गणवेश उपलब्ध करून दिला जाणार असून माध्यान्ह आहार देखील पहिल्या दिवसापासून उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. तसेच दोन वर्षे इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. मात्र यावेळी सायकल वितरणाचा निर्णय ही शिक्षण खात्याकडून घेतला जाणार आहे. तसेच दसरा सुट्टीमध्ये हि कपात केली जाणार असून प्रतिभा कारंजी, समुदाय दत्त आदी कार्यक्रमांचे शाळेत आयोजन करावे लागणार आहे.
Web Title: Academic Year 2022 23 Will Be Known As The Year Of Education Awareness
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.
टॅग्स :educationbelgaumawarenessAcademic
HomePaschim-MaharashtraAcademic Year 2022 23 Will Be Known As The Year Of Education Awareness Pjp78