गणपतीच्या प्रसादात पहिला मान खोबऱ्याच्या खिरापतीचा! खोबऱ्याची आणि पंचखाद्याची

in #news2 years ago

khirapat-feature_202208874015.jpegठळक मुद्दे
सुक्या खोबऱ्याची खिरापत करताना सुकं खोबरं मंद गॅसवर खरपूस भाजलं तरच ही खिरापत खमंग लागते.
पंचखाद्य खिरापतीत खारीक बारीक तुकडे करुन किंवा वाटून घालावी.
गोव्यात पंचखाद्य खिरापत करताना ओलं नारळ आणि गूळ वापरला जातो.
गणपतीसाठी वेगवेगळ्या खिरापती केल्या जात असल्या तरी पहिला मान असतो तो खोबऱ्याच्या खिरापतीला. सुक्या खोबऱ्याची खिरापत आणि पंचखाद्याची खिरापत ही प्रसाद म्हणून वाटण्यासाठी पहिले केली जाते. अनेक घरांमध्ये गणपती उत्सवाची तयारी म्हणून आधी खिरापत तयार केली जाते. सुक्या खोबऱ्याची खिरापत असू देत किंवा पंचखाद्य दोन्ही आरोग्यास फायदेशीर असतात. दोन्ही खिरापती तयार करायला (how to make khirapat and panchkhadya) अगदी सोप्या आहेत. गोव्यात पंचखाद्य खिरापत करताना ओलं खोबरं वापरलं जातं तर इतरत्र पंचखाद्य खिरापतीसाठी सुकं खोबरं वापरण्याची पध्दत आहे.