सामान्यांना झटका! मे महिन्यात घाऊक महागाई विक्रमी उच्चांकावर

in #yavatmal2 years ago

2inflation_india_ECM.jpgएकीकडे देशातील जनतेला किरकोळ महागाई (Retail Inflation) दरामध्ये दिलासा मिळाला असतानाच ग्राहकांना आता आणखी एक धक्का बसला आहे. घाऊक महागाई (Wholesale Inflation) दर मे महिन्यात पुन्हा 15 टक्क्यांवर नोंदवला गेला असून, घाऊक महागाई दर 15.88 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात हा दर 15.08 टक्के होता ज्यामध्ये मे महिन्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे किरकोळ महागाई दरात घट नोंदवल्याचा काहीसा दिलासा देणाऱ्या बातमीनंतर दुसऱ्याच दिवशी सामान्यांना जोरदार झटका बसला आहे. घाऊक महागाई दर वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खनिज तेल, कच्चे तेल, नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली वाढ मानण्यात येत आहे. (Wholesale Inflation News IN Marathi )सलग 14 महिने दुहेरी अंकात खाद्यपदार्थांपासून इतर गोष्टींच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे घाऊक महागाईच्या दरात विक्रमी नोंद करण्यात आली आहे. वाढत्या किमतींमुळे सलग 14 महिन्यात घाऊक महागाई दर दुहेरी अंकात नोंदवला जात आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत घाऊक महागाई दर 13.11 टक्के होता. घाऊक महागाईचा हा नवा उच्चांक गेल्या नऊ वर्षांतील सर्वोच्च असून, गेल्या 30 वर्षांतील एप्रिल महिन्यातील हा दर सर्वाधिक आहे.मे महिन्यात किरकोळ महागाई दरात घटगेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या महागाईत (Inflation) सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आली असून, भारताचा किरकोळ चलनवाढीचा (Retail Inflation) दर मे महिन्यात 7.04% इतका होता, जो एप्रिल महिन्याच्या तुलनेत किंचित कमी नोंदवण्यात आला आहे. एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 7.79 टक्क्यांवर पोहोचला होता. (Retail Inflation News)सोमवारी जारी करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, कंज्यूमर प्राइस इंडेक्स आधारित किरकोळ चलनवाढीचा दर एप्रिलमध्ये 7.79% वरून घटून 7.04% झाला आहे. मे महिन्यात खाद्यपदार्थ, पेट्रोल-डिझेल आणि विजेच्या दरात कपात झाल्याने किरकोळ महागाईचा दर कमी झाला आहे.