Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 319 रुग्ण सापडले, XBB व्हेरियंटच्या 36 रुग्णांची नोंद

in #digras2 years ago

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 319 नव्या रुग्णांची नोंद (Maharashtra Corona Update) झाली असून 406 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एक्सबीबी व्हेरियंटचे (Covid-19 XBB sub-variant) एकूण 36 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण 79,81,541 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले असून त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.16 टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही 81,31,458 इतकी झाली आहे.

754ab6b63420d771ac00bf70c523cde81666588281780272_original.webp