Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात रविवारी 286 कोरोना रूग्णांची नोंद, एक बाधिताचा मृत्यू

in #digras2 years ago

राज्यात आज कोरोना (Covid-19) संसर्गाच्या 286 नवीन रूग्णांची (Maharashtra Corona Update) नोंद झाली आहे. तर, 313 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रूग्णांच्या निधनाबाबत जाणून घ्यायचे झाल्यास राज्यात आज एक कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येबाबत जरी दिलासादायक माहिती असली तरी मात्र एक्सबीबी व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. राज्यात आतापर्यंत एक्सबीबी व्हेरियंटचे (Covid-19 XBB sub-variant) एकूण 36 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण 79,81,854 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले असून त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.16 टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही 1,48,386 इतकी झाली आहे. 1dfcdb69d188e8fa596257f0e38e5f231667130561544358_original.webp