Video Viral : जंगलात थिरकला 'चंद्रा'चा नाद; या तरूणाचे हावभाव एकदा पाहाच

in #news2 years ago

चंद्रमुखी या मराठी चित्रपटातील चंद्रा या गाण्याने अनेकांना वेड लावले आहे. मुलींसहित अनेक तरूणही या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. दहिहंडी, नवरात्र आणि गणेशोत्सवात या गाण्याचा बोलबाला होता. तर या गाण्यावर डान्स करणारे अनेक तरूणांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असाच एका तरूणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Young Boy Chandra dance Video Viral)व्हिडिओ जंगलातली असून काही मुलांची टीम फिरायला गेल्याचं या व्हिडिओतून समजतंय. फिरायला गेले असता जंगलात मध्येच गाडी थांबवून या तरूणाने चंद्रा या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड शेअर केला जात असून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस यावर पडला आहे.कार्यक्रमात चक्क तरूणांनी मुलींनाही लाजवेल असा डान्स प्रचंड व्हायरल होत होता. त्यानंतर आता हा जंगलातील चंद्रा डान्स व्हायरल होत आहे. स्टार मराठी या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे.
Web Title: Young Boy Jungle Chandra Dance Video Viral
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.Canva__23_.jpg