Lungs Cancer : धूम्रपान करता... फुफ्फुसाच्या कॅन्सरला निमंत्रण

in #maharatlast year

image.png
सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन आणि हुक्का यामुळे धूम्रपानाचा विळखा आवळत आहे. त्यामुळे देशात दर आठव्या मिनिटांत एकाला फुफ्फुसाचा कॅन्सर विळख्यात घेतो. ९० टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर हा धूम्रपानामुळेच होतो. या जीवघेण्या कॅन्सरचे वेळीच निदान होत नसल्याने दिवसेंदिवस चिंताजनक स्थिती निर्माण होत आहे.

याशिवाय दरवर्षी नवीन निदान होणाऱ्या एकूण कॅन्सरग्रस्तांपैकी ७ टक्के कॅन्सर फुफ्फुसांचे असतात. दरवर्षी तब्बल ७० ते ९० हजार नवीन व्यक्तींना फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान होते.विशेष म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर हरियाणा, दिल्ली, चेन्नई या राज्यांमध्ये वेगाने वाढतोय. तसेच महाराष्ट्र पहिल्या पाच क्रमांकाच्या पंक्तीत जाऊन बसत आहे. एकट्या फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण हे १४ टक्के नोंदविले गेले आहे.धूम्रपानामुळे ८० ते ९० टक्के रुग्णांना फुफ्फुसांचा कॅन्सर होतो. यानंतरही आपल्याकडे तब्बल २८.६ टक्के जनता तंबाखू व तत्सम व्यसनाला जवळ करते. यात पुरुषांचे प्रमाण ४२.४ टक्के तर महिलांचे प्रमाण १४.०० टक्के आहे.फुफ्फुसाच्या कॅन्सरची इतर कारणेआनुवंशिकवाढते प्रदूषणप्रदूषित हवेचा सततचा सहवासदीर्घकालीन फुफ्फुसांचे विकार
लक्षणेदीर्घकाळ खोकलाछातीत कफ असणेखोकल्याद्वारे, थुंकीद्वारे रक्त जाणेश्वास घेताना त्रास होणेचेहरा व आवाजात बदल होणे रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतरफुफ्फुसाचा संसर्ग होणेन्यूमोनिया होणेदीर्घकाळ ताप असणेअशक्तपणावजन कमी होणेअलीकडे फॅशन म्हणून धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने फुफ्फुसाच्या कॅन्सर होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याने तातडीने धूम्रपानाचे व्यसन टाळावे. यात पूर्वनिदान आवश्यक आहे. इबस ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रियेद्वारे पूर्वनिदान आणि स्टेज माहिती करून घेणे शक्य आहे. योग्य उपचार आणि पूर्वनिदानाद्वारे फुफ्फुसांचा कॅन्सर बरा होऊ शकतो.- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ