समृध्दी महामार्गावर गर्डर कोसळून कामगारांचा मृत्यू प्रकरण, दादा भुसेंनी केला महत्वाचा खुलासा

in #maharatlast year

ताज्या
शहर

साप्ताहिक
मनोरंजन
देश
IPL

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो

Live
LIVE Marathi News Updates :समृध्दी महामार्गावर गर्डर कोसळून कामगारांचा मृत्यू प्रकरण, दादा भुसेंनी केला महत्वाचा खुलासा
Published on : 4 August 2023, 1:10 pm

By
सकाळ डिजिटल टीम

03:28 AM, Aug 04 2023
राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
01:10 PM, Aug 04 2023
समृध्दी महामार्गावर गर्डर कोसळून कामगारांचा मृत्यू प्रकरण, दादा भुसेंनी केला महत्वाचा खुलासा
विधानसभेत दादा भुसे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून अनेक कामरागांचा मृत्यू झाला होता. हाय टेंशन वायरला क्रेन लागून करंट लागला नसल्याचं मंत्री दादाभुसे यांनी विधान परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या नेमकी घटना घडली कशी याबाबत सिंगापूर न्युजलंड येथील तज्ज्ञांची टीम तपास करत असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.

01:00 PM, Aug 04 2023
विरोधकांचा सभात्याग, विधानसभेतून विरोधकांनी बाहेर जाण्याचा घेतला निर्णय
विधानसभेच्या कामकाजातून विरोधकांनी बाहेर जात, सभात्याग केला.
11:47 AM, Aug 04 2023
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर राहुला गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले'आज नाही तर उद्या...'
सुप्रिम कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया आली आहे. कॉंग्रेसच्या मुख्यालयात बोलताना ते म्हणाले की, "आज नाही तर उदय, उद्या नाही तर परवा पण विजय होतोच. काय करायचं हा माझा रस्ता क्लीअर आहे. लोकांनी दिलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल त्यांचे आभार."
11:20 AM, Aug 04 2023
'राहुल गांधींचा नाही तर, संविधानाचा विजय आहे, मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया
राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात राहुल गांधींचं स्वागत केलं. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "लोकशाही आणि संविधानाचा विजय झालाय, सत्यमेव जयते""
10:57 AM, Aug 04 2023
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात!
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी एनडी स्टुडीओ येथे आत्महत्या केली होती.

Sort:  

कॉपी पेस्ट करना तक आता नही आपको