इमरान खान यांचे तुरुंगात होतायेत हाल, 'अ'दर्जाची सुविधा मिळावी यासाठी केली याचिका

in #maharatlast year

image.png
Monday, August 7, 2023
AMP

ताज्या
शहर

साप्ताहिक
मनोरंजन
देश
IPL

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो

Imran Khan Arrest : इमरान खान यांचे तुरुंगात होतायेत हाल, 'अ'दर्जाची सुविधा मिळावी यासाठी केली याचिका
Published on : 7 August 2023 5:03 PM

By
सकाळ डिजिटल टीम

Imran Khan Jail:तोशखाना प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पंजाब प्रांतातील अटक जेलमध्ये शिक्षा भोगणारे पीटीआय प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खांन यांना मृत्यूची भीती वाटत आहे.इमरान खान यांच्या वकीलांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या तब्यतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तैनात करण्यात आली आहे, जी दिवसरात्र त्यांची सुरक्षा करत आहे. इमरान खान यांच्या नशीबी जे तुरुंग आलंय, त्यात खुंखार कैद्यांना ठेवलं जातं. 'सी'ग्रेडच्या तुरुंगात इमरान खान यांना सामान्य कैद्याप्रमाणे राहावं लागतय. पीटीआय पक्षाच्या नेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका केलीये की त्यांना 'ए'ग्रेडच्या तुरुंगात हलवण्यात यावं. त्यांनी विनंती केलीये की इमरान खान यांना आदियाला तुरुंगात शिफ्ट केलं जावं.

पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय)ने सोमवारी (दि.७ ऑगस्ट)पीटीआय अध्यक्ष इमरान खान अटक तुरुंगातून अदियाला तुरुंगात स्थलांतरित करण्याची इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेत सांगण्यात आलंय की,"शिक्षा, सवय आणि सामाजिक आणि राजकीय परिस्थिती " पाहता असं केलं पाहिजे. इमरान खान यांना तुरुंगात चांगल्या सुविधा पुरवल्या पाहिजेत. (Latest marathi news)इमरान खान यांचे तुरुंगात होतायेत हालयाचिकेच सांगण्यात आलंय की,"इमरान खान लहानपणापासूनचं एका संपन्न कुटुंबातून येतात. आपले शिक्षण, सवयी आणि सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमुळे त्यांना चांगल्या जीवनशैलीची सवय आहे. ते पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कर्णधार देखील होते." त्यांची सामाजिक, राजकीय परिस्थिती, शिक्षा आणि त्यांच्या जीवनशैली पाहता, याचिका करणारा पाकिस्तान तुरुंग नियमांच्या नियम क्रमांक २४८ आणि २४३चा संदर्भ घेत 'ए' दर्जाच्या सुविधांचा मानकारी आहे."
हेही वाचा: Taali Trailer: देशात कुत्र्यांसाठी प्रेमाला जागा, पण आमच्यासाठी....! सुष्मिताचा प्रश्न

इमरान खान यांना ५ ऑगस्टला पाकिस्तानच्या जिल्हा सत्र न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवलं या आरोपांना ते खोट ठरवत होते. न्यायाधीश हुमायून दिलावर यांनी आपल्या निर्णयात लिहिलं की, "पीटीआय अध्यक्षांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने संपत्ती गोळा केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत." त्यांनी इमरान खान यांना ३ वर्षाचा तुरुंगवास आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याचबरोबर त्यांना तात्काळ अटक करण्याचं वॉरंटही जारी करण्यात आलं होतं. (Latest Marathi News)
हेही वाचा: Raj Thackeray : ब्रेकिंग! उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार; दोन्ही भाऊ एकत्र येणार का?