CM Eknath Shinde: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा पालघर दौरा अचानक झाला रद्द! हे आहे कारण

in #maharatlast year

image.pngPalghar Newsमुंबई- जागतिक आदिवासी दिना निम्मित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार पालघर दौरा करणार होते. पण, त्यांचा हा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. शिंदे आणि फडणवीस, अजित पवार पालघर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहणार होते. पण, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
सध्या पालघरमध्ये वातावरण खराब आहे. पाऊस सतत सुरु आहे. अशा परिस्थिती हेलिकॉप्टरने प्रवास करणे अवघड आहे. पालघर पर्यंत पोहचणे शक्य नसल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. जागतिक आदिवासी दिना निम्मित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पालघर येथे आयोजित कार्यक्रमांना उपस्थिती लावणार होते. दरम्यान, व्हर्च्युअल पद्धतीने मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री या कार्यकामाल हजेरी लावणार असल्याचं कळतंय.