जगभरात 2023 पर्यंत तरूणांची संख्या 57 वाचा आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं महत्व अन् इतिहास

in #maharatlast year

image.png
Saturday, August 12, 2023
AMP

ताज्या
शहर

साप्ताहिक
मनोरंजन
देश
IPL

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो

International Youth Day : जगभरात 2023 पर्यंत तरूणांची संख्या 57%! वाचा आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं महत्व अन् इतिहास
Published on : 12 August 2023 8:07 AM

By
साक्षी राऊत

International Youth Day History & Significance : दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. 12 ऑगस्ट हा दिवस जागरुकता दिवस म्हणून साजरा केला जातो, जो संयुक्त राष्ट्रांनी (UN) नियुक्त केला आहे. यूएन जनरल असेंब्ली (UNGA) ने लिस्बनमधील तरुणांसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांच्या जागतिक परिषदेने केलेल्या शिफारसी स्वीकारणारा ठराव मंजूर केल्यानंतर 1999 मध्ये पहिला युवा दिवस साजरा करण्यात आला.

जगभरातील तरुणांना प्रभावित करणाऱ्या विविध समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन पाळला जातो.आंतरराष्ट्रीय युवा दिनाचा इतिहास1965 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने तरुणांवर प्रभाव टाकण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यास सुरुवात केली. त्यांनी शांतता, परस्पर आदर आणि लोकांमधील समजूतदारपणाच्या आदर्शांच्या युवकांमधील प्रचाराच्या घोषणेचे समर्थन केले. तरूणांना जगाच्या पाठीवर बळकटी देण्यासाठी आणि त्यांच्या गरजा समजून त्यांना संसाधने पुरवण्याचा हा एक सकारात्मक प्रयत्न होता.
17 डिसेंबर 1999 रोजी, यूएन जनरल असेंब्लीने युथसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांच्या जागतिक परिषदेने केलेल्या शिफारशीला मान्यता दिली आणि आंतरराष्ट्रीय युवा दिनाची स्थापना करण्यात आली. हा प्रथम 12 ऑगस्ट 2000 रोजी साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून हा दिवस समाजाला शिक्षित करण्यासाठी त्यांच्या जागरुकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. तरुणांना राजकारणात एकत्र आणणे आणि जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी संसाधने व्यवस्थापित करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश्य आहे.
हेही वाचा: Youth Politics : युवा नेते देताहेत राजकारणाला नवी दिशा...

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्वदरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय युवा दिवस, तरुणांच्या गुणांचा आणि राष्ट्राच्या आणि संपूर्ण जगाच्या विकासासाठी त्यांच्यात असलेल्या क्षमतेचा सन्मान करण्यासाठी आहे. हा दिवस तरुणांपुढील आव्हानांना एक व्यासपीठ देतो आणि समस्या दूर करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो. समाजाच्या विकासासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि विविध सामाजिक प्रकल्पांमध्ये स्वयंसेवा करण्यासाठी तरुणांचे खूप मोठे योगदान आहे. (History)
हेही वाचा: Youth : तरुणांच्या बर्बादीची 5 कारणं...

आंतरराष्ट्रीय युवा दिन जगभरातील तरुणांना अनुभवलेल्या अडचणींवर लक्ष केंद्रित करतो. बहुसंख्य मुले मूलभूत शिक्षणापासून वंचित आहेत आणि भूक व गरिबीने ग्रस्त आहेत. ही समस्या त्यांच्या वाढीच्या मार्गात अडथळा आहे. त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ते आश्वासक तरुण बनतील, यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे. हा दिवस सर्वांना संयुक्त राष्ट्राच्या प्रयत्नांमध्ये सामील होण्यासाठी आणि त्याचे शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी आवाहन करतो. (Youth)यंदाची थीमदरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त वेगवेगळ्या थीम्स असतात. यंदाच्या युवा दिनाची २०२३ ची थीम - जगाच्या विकासासाठी जगभरातील तरूणांना हरित कौशल्याचं महत्व सांगणारी आहे. (Green Skills For Youth : Towards A Sustainable World). सध्या पृथ्वीवर अर्ध्यापेक्षा जास्त लोक ३० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत. २०२३ पर्यंत हा आकडा ५७ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Jawan Prevue Theme: 'जवान'ची प्रिव्ह्यू थीम रिलीज! गाणं ऐकून शाहरुखच्या चाहत्यांनी धरला ठेका

आज जग हरित क्रांती घडवून आणण्यात अग्रेसर आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने टिकाऊ वस्तू, आणि पर्यावरणाला अनुकूल असे परिवर्तन घडवून आणण्यावर हरित कौशल्याचा विकार अवलंबून असेल.यात ग्रीन टेक्नॉलॉजी आणि कौशल्यांचा समावेश असेल, जे ग्रीन टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर करण्यास तरूणांना सक्षम बनवेल.