माझिया माहेरा : सुगंधी आठवणींचा खजिना

in #yavatmalmumbai2 years ago

सुधामती पारखी, पुणेमाहेराचे कौतुक करण्यात आपला महिलांचा हात कोणीच धरू शकत नाही, हे अगदी त्रिवार सत्य आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या माहेराचा सार्थ अभिमान असतो. मी पूर्वाश्रमीची शकुंतला रानवडे. मुळा नदीच्या काठावर रम्य अशा परिसरात वसलेले औंध हे माझे माहेर. नदीकाठी असलेले विठ्ठल रखुमाईचे मंदिर, गावाच्या मध्यावर असलेले भैरवनाथाचे मंदिर, रामाचे मंदिर आणि गावाच्या वरच्या बाजूला असलेले मारुतीचे मंदिर ही गावातील भक्तिस्थळे. सर्व उत्सव गावकरी एकजुटीने साजरे करतात. दरवर्षी भैरवनाथाचा उत्सव साजरा केला जातो, छबिना निघतो, आमच्या घराण्यात पाटीलकी असल्यामुळे छबिना उचलण्याचा मान माझ्या भावांना दिला जातो. पंचक्रोशीतून लोक गावात येतात. कार्तिक महिन्यात विठ्ठलाच्या मंदिरात मोठा अन्नकोट केला जातो. सर्व गावकरी घरचे कार्य असल्यासारखे मदतीला येतात. सर्वांना जेवण दिले जाते.गावामध्ये सरदार महादजी शिंदे यांचा मोठा वाडा आहे. त्या वाड्याशेजारीच माझे माहेर आहे. माझे माहेर म्हणजे जणू गोकुळच आहे. आता आईवडील नाहीत, तरी भाऊ- भावजया कधीही विसरत नाहीत. दरवर्षी राखी पौर्णिमेला आणि दिवाळीला दोघी बहिणी आपापल्या घरी भावांना जेवायला बोलावतो. आई-वडिलांच्या मायेच्या छत्राखाली घालवलेले ते दिवस अजूनही आठवतात आणि डोळे पाणवतात. वडील नोकरी करून मांडवाचा व्यवसाय करायचे, त्यामुळे त्यांना ‘मांडववाले रानवडे’ म्हणून सर्वजण ओळखायचे.एखाद्या गरिबाला अवघ्या २५ ते ३० रुपयातसुद्धा ते मांडव घालून द्यायचे. कुणाची तेवढे पैसे द्यायची ऐपत नसेल, तर ‘अहो तुमच्या मुलीचे लग्न म्हणजे माझ्या मुलीचेच लग्न आहे,’ असे म्हणून त्यांनी फुकट मांडव घालून दिलेला आहे. त्या काळात माझ्या वडिलांनी कुणालाही पैशासाठी कधी अडवले नाही. गोरगरिबांची खूप जाणीव त्यांना होती. तेच संस्कार त्यांनी आम्हा बहीण भावंडांवर केले आहेत. त्या आठवणी मी हृदयाच्या एका कप्प्यात सुगंधी कुपीसारख्या जपून ठेवल्या आहेत.
RECOMMENDED ARTICLES

Sindhudurg : बांद्यातील नुकसानीचे पंचनामे करा
बांदा : चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बांदा-आळवाडा बाजारपेठेत पाणी घुसले होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे भेट देत तत्काळ ५० हजारांची मदत दिली. तसेच तहसीलदार श्रीनिवास पाटील यांना नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले. यावेळी
5 hours ago

वेदांतानंतर राज्याची Tata Airbus साठी धरपड; जाणून नेमका प्रोजेक्ट काय?
Tata Airbus Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट राज्यातून गेल्यानंतर आता टाटा-एअरबस प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या या प्रोजेक्टसाठी भाजपशासित राज्य असलेले उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्याकडून लॉबिंग सुरु आहे. नेमका
5 hours ago

Vedanta: सरकारचा विरोधकांवरच पलटवार; फडणवीस रशियातून परतल्यावर होणार चर्चा
मुंबई : राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या उदासिनतेमुळे वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातेत गेल्याचा आरोप भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री रशियाला गेले आहेत ते आल्यावर या बाबतीत सविस्तर चर्चा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. (Vedanta & Fox
5 hours ago
Vedanta Foxconn : नुसतं परदेशातील उद्योजकांना भेटून प्रकल्प येत नसतात, तर...; सामंतांचा अजित पवारांवर पलटवार
फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला आहे. (Vedanta Foxconn Industries Minister Uday Samant reply to Leader
5 hours ago
शेजारच्या वाड्यातील ओसरीवर मैत्रिणींबरोबर खेळलेले खेळ, नदीचा तो विस्तीर्ण घाट, गणपती विसर्जनाच्या वेळी तिथे केलेली आरती, विठ्ठल-रखुमाई मंदिरासमोरील ती दीपमाळ, तिच्याभोवती खेळताना घालवलेले दिवस, शाळेतले दिवस, त्या खेळांच्या स्पर्धा, गँदरिंगमध्ये बसवलेले नाटक, त्या नाटकात मी केलेली भूमिका, गाणी ऐकायची खूप आवड असल्यामुळे घरात रेडिओ नसताना समोरच्या घराच्या कट्ट्यावर बसून ऐकलेल्या बिनाका गीतमाला आणि माझी आवड लक्षात ठेवून एक दिवस वडिलांनी घरी आणलेला मोठा रेडिओ, हे सर्व आठवले, की एक प्रकारची हुरहूर लागते जीवाला. मन हळवे होते, डोळे पाण्याने भरून येतात, मन पाखरू होऊन जाऊन येतेसुद्धा माहेराला... पण मग वाटते, गेले ते दिवस. लहानपण कुणालाच परत आणता येत नाही; पण त्या आठवणींच्या जीवावर तर माणूस जगत असतो, नाही का?माझे सासर आणि माहेर दोन्हीही अगदी सोन्यासारखी आहेत. आता आयुष्याच्या या वळणावर मन अगदी तृप्त आहे. माझ्या मुलींची लग्ने झाली, त्या आपापल्या सासरी सुखाने नांदत आहेत, मुलगा त्याचा व्यवसाय सांभाळतो. तिन्हीसांजेला तुळशीला दिवा लावून तिच्याजवळ थोडा वेळ बसते आणि तिला नमस्कार करून देवाला सांगते, ‘दे रे देवा मला संपत्ती आगळीवेगळी, सुखी ठेव माझ्या सासरची आणि माहेरची सारी मंडळी.’
Web Title: Sudhamati Parakhi Writes Majhia Mahera
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.
टॅग्स :puneWomens Corner
HomeWomens-CornerSudhamati Parakhi Writes Majhia Mahera Pjp78

Subscribe to Notifications