येत्या २ वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

in #mumbai2 years ago

दर्जेदार रस्ते बांधले जात आहेत. निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या २ वर्षांत ५५०० कोटी रुपयांचे काँक्रिटचे रस्ते बांधण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. येत्या दोन वर्षांत मुंबईचा बदललेला चेहरा पाहायला मिळणार आहे. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सांताक्रुझ येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईच्या विकासाला आणखी गती देणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (एमटीएचएल) काम सुरू आहे. २२ किमी लांबीचा हा देशातील सर्वात लांब सी-लिंक आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.