काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ३० क्विंटल तांदूळ पकडला; खामगाव पोलीसांची कारवाई

in #nnmedia2 years ago

EEEoA8oLaAxtVnttk7BKQUv7u6zLMTvxJ9xDjtpd7uq6f8dWTLimwUrg2npzc9XgEyYSRjUagnsAQmZj5h85mgqRsnDbEXHMJoVHkTwaVeYmB3RGPLPwgkpY1XeqMbeg2Y7nBRFN1PPQm4azxV5fC.jpeg

खामगाव: सार्वजनिक वितरण प्रणालीचा तब्बल ३० क्विंटल तांदूळ खामगाव पोलीसांनी गुरूवारी रात्री पकडला. पकडण्यात आलेले वाहन खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे. त्यामुळे रेशन माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विविध शासकीय योजनांमार्फत लाभार्थ्यांना स्वस्त:धान्य दुकानांतून वितरीत करण्यात येणाºया तांदळासह धान्याची खुल्या बाजारात विक्री केली जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने गत आठवड्यातच उघडकीस आले. त्यानंतर शेगाव पोलीसांनी एका वाहनांसह स्वस्त: धान्य दुकानदारावर कारवाई करण्यात आली.

रेशनचे धान्य विकल्याप्रकरणी शेगाव पोलीसांत स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुरूवारी रात्री खामगाव पोलिसांनी सापळा रचून ३० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारे वाहन जनुना रोडवर पडकले. एमएच २८ बीबी ४६३७ हे वाहन जनुना रस्त्यावर पोलीस निरिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात पकडण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात अपहारजिल्ह्यातील महिन्याकाठी ४० ते ४५ हजार क्विंटल धान्याची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक आणि वाहतूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने १४ सप्टेंबरच्या अंकात उजेडात आणले. त्यानंतर पोलिस प्रशासनाने सजग होत कारवाई सुरूवात केली. रेशन धान्याचा घोळ ५० ते ६० हजार क्विंटलपेक्षा अधिक असल्याची चर्चा आहे.

रेशनचा माल कुणाचा?पोलीसांनी वाहन क्रमांक एमएच २८ बीबी ४६४७ शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केले आहे. हे वाहन खामगाव तालुक्यातील निपाणा येथील सैनिकाचे असल्याची चर्चा आहे. दरम्यान, वाहनातील तांदळाचा साठा कुणाचा याबाबतचा शोध पोलीस घेत आहे.