लष्कराला मोठं यश, पाकिस्तानी दहशतवाद्यासह 'लष्कर-ए-तौयबा'च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

in #gaul2 years ago

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) मंगळवारी भारतीय लष्कर (Indian Army) आणि पोलिसांना मोठं यश मिळालंय. कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तौयबाच्या (Lashkar-e-Taiba) दोन दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिलीय. मारल्या गेलेल्यांमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलंय.कुपवाडा येथील चतारस कंडी भागात झालेल्या चकमकीची माहिती पोलिसांना मिळाली होती. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, एलईटीचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यात पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही हात असल्याचं त्यांनी म्हटलंय. सध्या परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरूय.