Earthquake : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; जाणून घ्या, किती होती तीव्रता

in #yavtmal2 years ago

bhukamm.jpgEarthquake : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये 3.4 इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे 3.28 च्या सुमारास हे धक्के जाणवले. कटरापासून ६२ किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे