सेमी फायनलमध्ये पाऊस पडला तर काय होणार, जाणून घ्या आयसीसीचे नवीन नियम

in #mumbai2 years ago

![]( फायनलमध्ये जर पाऊस पडला, तर काही काळ वाट बघितली जाईल. पाऊस थांबल्यावर पंच हे मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर हा सामना किती षटकांचा खेळवायचा याचा निर्णय घेतला जाईल. पण जर पाऊस पडतच राहीला तर मात्र हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो. कारण यावेळी आयसीसीने सेमी फायनल आणि फायनलसाठी आता राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर पहिल्या दिवशी पावसामुळे सामना झाला नाही तर तो दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो.

जर सेमी फायनलच्या राखीव दिवशीही पाऊस पडला तर काय होणार....
सेमी फायनलसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. पण या राखीव दिवशीही पाऊस पडला तर काय होणार, याचाही नियम आयसीसीने बनवला आहे. जर राखीव दिवशीही पाऊस पडला तर मात्र गुणतालिका पाहिली जाईल. गुणतालिकेत ज्या संघाचे जास्त गुण असतील त्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश दिला जाईल.

भारताने झिम्बाब्वेवर विजय साकारला आणि त्याने पाकिस्तानला मागे सारत आता गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. कारण पाकिस्तानचे विजयानंतर सहा गुण झाले होते. पण त्यानंतर भारताने विजय साकारला आणि त्यांचे आठ गुण झाले त्यांनी आता गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. जर भारत दुसऱ्या स्थानावर राहिला असता तर त्यांना न्यूझीलंडचा सामना करावा लागला असता. पण भारताने झिम्बाब्वेवर विजय साकारला आणि त्यांना आता इंग्लंडच्या संघाशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे भारताला सेमी फायनलमध्ये जिंकण्याची संधी जास्त असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता जर पावसामुळे रद्द करावा लागला तर भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची चांगली संधी असेल. त्यामुळे आता सेमी फायनलमध्ये काय घडते, याकडे सर्वांचा लक्ष लागलेले असेल.