ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीत पुन्हा अस्वस्थ वातावरण Published on : 11 October

in #news2 years ago

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीत पुन्हा अस्वस्थ वातावरण Published on : 11 October 2022, 2:36
pawaranil (50) in digras • 12 minutes ago
ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीत पुन्हा अस्वस्थ वातावरण
Published on : 11 October 2022, 2:36 pm

By
सकाळ वृत्तसेवा
एसटीच्या संपकाळात राज्य सरकारने वेतनाचा फरक देण्याची कबुली दिली होती. त्यानुसार दरमहा ३६० रुपयांचा फरक पडणार असे उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालात स्पष्ट झाले होते.

मुंबई - कामगार वेतन करारानुसार महिन्याच्या ७ तारखेला एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन होणे अपेक्षित आहे. मात्र, या ७ तारखेला फक्त आगार स्तरावरील चालक, वाहक यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे वेतन झाले असून, विभाग स्तरावरील आणि मध्यवर्ती कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप झाले नाही. ५ दिवस होऊनही अद्याप वेतन मिळाले नसल्याने दिवाळी अंधारात जाते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्यवर्ती आणि विभाग स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.एसटीच्या संपकाळात राज्य सरकारने वेतनाचा फरक देण्याची कबुली दिली होती. त्यानुसार दरमहा ३६० रुपयांचा फरक पडणार असे उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालात स्पष्ट झाले होते. मात्र, भाजपा-शिंदे सरकारच्या काळात दरमहा फक्त १०० कोटी मिळत असल्याने राज्यातील एक लाख एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होत नसल्याचे दिसून येत आहे. ७ ऑक्टोंबर रोजी फक्त आगार स्तरावरील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्याने आता कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहे. ऐन दिवाळीच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होत आहे. यापूर्वी एसटीचे शासनात विलीनीकरण व्हावे आणि सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासाठी संप पुकारण्यात आला होता त्या संपाला आता एक वर्ष पूर्ण झाले असूनही, एसटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडवण्यात सरकारला यश येत नसल्याचे दिसून येत आहे. एसटीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना वेतन मिळत नसतांना महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात संपात सहभागी होणारे भाजपा नेते आता कुठे गेलेत अशा पोस्ट समाजमाध्यमांवरून व्हायरल होत असून, ॲड. सदावर्ते, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे.

एकतर राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून केवळ १०० कोटींची मदत शासन करत आहे. त्यामध्ये फक्त पगार हातात मिळत असून, सोसायटी, पीफ, ग्रज्युटी, एल आय सी हफ्ता कापून घेतल्याचे दाखवल्या जाते मात्र प्रत्यक्षात ते पैसे भरल्या जात नसल्याने एल आय सी सारखी पॉलिसी बंद पडून कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याला विम्याचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात3W72119s5BjW4PvRk9nXC4LsiTkp4kF69xucQWu2w9s9aHNWv6cp6JjU3qt1GaeyHH1Mgm5NJetDfhuQbknaiz4x3ermB6PJKHfaazQC5mHFJ8JrhFWP66.png