Social Viral : सौंदर्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 5 पोलिसांची बदली, वाचा संपूर्ण प्रकरण

in #yavatamal2 years ago

: सोशल मीडियावर सध्या एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये सौंदर्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 5 पोलिसांची बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एका विशेष सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तमिळनाडूतील मायिलादुथुराई येथील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे.31 जुलै रोजी मायिलादुथुराई जिल्ह्यातील सेम्बनारकोइल येथे एका खाजगी संस्थेने सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये या पाचही पोलिसांनी रॅम्प वॉक केला होता. या स्पर्धेत अभिनेत्री याशिका आनंद हिनेही विशेष निमंत्रित म्हणून सहभाग नोंदवून स्पर्धेचे उद्घाटन केले होते. याबाबतचे वृत्त दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाले.

5 पोलिसांच्या बदल्या

नागपट्टिनम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जवागर यांनी विशेष सहाय्यक निरीक्षक सुब्रमण्यम यांच्यासह रेणुका, अश्विनी, नित्यशिला आणि शिवनेसन या पाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. हे सर्वजण सध्या सेम्बनारकोविल पोलीस ठाण्यात कार्यरत होते.